मुंबई

कडक उन्हात राबणाऱ्या स्वच्छता दूतांना पालिकेचा आधार

CD

कडक उन्हात राबणाऱ्या स्वच्छता दूतांना पालिकेचा आधार
चौक्यांवर मिळणार ओआरएस, पाणी; ​आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ : मुंबईत सध्या उन्हाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले असताना, शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मैदानावर राबणाऱ्या ४० हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. कडक उन्हामुळे होणारा उष्माघात आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी सर्व स्वच्छता चौक्यांवर तातडीने पिण्याचे पाणी आणि ओआरएस पावडरची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
​मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी सुमारे ४० हजार सफाई कामगार भरउन्हात आपले कर्तव्य पार पाडत असतात. वाढत्या तापमानामुळे या कर्मचाऱ्यांना चक्कर येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक चौकीत कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची पुरेशी सोय आणि ओआरएस पाकिटांची उपलब्धता असावी.
महापालिकेचे कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र, सध्याची उष्णतेची परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊनच काम करावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.
​केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता चौक्यांवर पाणी आणि ओआरएसचा पुरवठा नियमित होतोय की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

विविध स्तरांवर जनजागृती मोहीम
वाढत्या उष्म्यापासून कसा बचाव करावा, याबद्दल पालिकेकडून विविध स्तरांवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. भरउन्हात मुंबई चकाचक ठेवणाऱ्या हातांना आता प्रशासनाने माणुसकीची साथ दिली असून, या निर्णयामुळे हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT