मुंबई

विदेशी कोट्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

CD

विदेशी कोट्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई
१२१ रेल्वे प्रवासी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : विदेशी पर्यटकांसाठी राखीव असलेल्या ‘फॉरेन टुरिस्ट कोटा’चा (एफटी कोटा) गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने कडक कारवाई सुरू केली असून, ३९ प्रकरणांत तब्बल ३,५६,९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान १२१ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आले.
वैध कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिक विदेशी कोट्यातून तिकीट काढून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य रेल्वेने ही मोहीम तीव्र केली. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘संगमित्रा एक्स्प्रेस’मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एफटी कोट्यातील भविष्यातील आरक्षणांचा सखोल आढावा घेण्यात आला. २४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत ३१ गाड्यांमध्ये मध्य रेल्वेकडून १७४ मूळ पीएनआर विदेशी कोट्याअंतर्गत जारी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित १२१ प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.
...
तपशील मागितला
विदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीत साधारणतः चार आसने राखीव ठेवली जातात. मात्र काही प्रवाशांनी नियम धाब्यावर बसवून या सुविधेचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अधिकृत बुकिंग एजंटचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळवण्यासाठी आयआरसीटीसीकडे तपशील मागवण्यात आला असून तपास सुरू आहे. अशा गैरप्रकाराची माहिती ‘१३९’ हेल्पलाइन किंवा ‘रेल मदत’ ॲपद्वारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT