मुंबई

संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र द्या!

CD

संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र द्या!
उच्च न्यायालयाचे महापालिका, राज्य सरकारला आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर न्यायालयाने संरक्षण दिलेल्या जवळपास ९९ हजारांहून अधिक फेरीवाल्यांना ओळखपत्र द्या, असे आदेश बुधवारी (ता. ६) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. त्यामुळे वैध आणि अवैध फेरीवाले कोण हे ओळखणे सहज शक्य होईल, असे न्यायालयाने नमूद केले. पाच आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर विविध याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या असून त्या याचिकांवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. अवैध आणि बांगलादेशी फेरीवाल्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा खंडपीठाने राज्य सरकार आणि महापालिकेला केली. तुमच्याकडे न्यायालयाने संरक्षित केलेल्या ९९ हजार फेरीवाल्यांची यादी आहे, तर उर्वरित फेरीवाल्यांवर का कारवाई केली नाही, असा जाब न्यायालयाने या वेळी विचारला.

हे पालथ्या घड्यावर पाणी
ना फेरीवाला क्षेत्रात कारवाईबाबत काहीच अडचण येत नाही. अन्यत्र विशेषकरून फेरीवाला क्षेत्रात कारवाई करताना परवानाधारक कोण आणि अवैध कोण, हे ओळखणे त्रासदायक ठरत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून फेरीवाला क्षेत्रात गस्त घालण्याचे काम नियमित सुरू आहे; परंतु कारवाईनंतर काही वेळाने फेरीवाले पुन्हा येत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर तीच तीच कारणे देत असल्याचे सुनावून हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

मनुष्यबळ आणि निधी द्या!
या गंभीर मुद्द्यावर राज्य सरकार काहीच पावले उचलणार नसेल, तर त्यांनी पालिकेला निधी, मनुष्यबळ, साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. पालिका प्रशासन त्यांच्या पातळीवर फेरीवाल्यांवर कारवाई करेल, असेही न्यायालयाने सुनावले. संरक्षित फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आल्यावर बनावट ओळखपत्रांच्या आधारे बेकायदा पद्धतीने दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत २४ प्रभागांच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

तक्रारींसाठी व्यासपीठ उपलब्ध करा!
फेरीवाल्यांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक किंवा ई-मेल आयडी उपलब्ध करून द्या. सर्वसामान्य मुंबईकर तक्रार नोंदवतील आणि महापालिकेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई करता येईल, असेही न्यायालयाने सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT