मुंबई

हार्बरवर एसी लोकलमुळे गोंधळ

CD

हार्बरवर एसी लोकलमुळे गोंधळ
सायंकाळच्या गर्दीवेळी खोळंबा; स्वाक्षरी मोहिमेद्वारे निषेध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांत वाढ केली असली, तरी त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे. १ मेपासून आणखी १४ एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, एकूण एसी फेऱ्यांची संख्या २८वर पोहोचली आहे. मात्र या वाढीमुळे सायंकाळच्या गर्दीच्या वेळी विलंब, प्रचंड गर्दी आणि गैरसोयी वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
सीएसएमटी ते पनवेलदरम्यान काही नॉन-एसी गाड्यांच्या जागी एसी लोकल सुरू करण्यात आल्या. उष्णतेत दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी एसी तिकिटांचे दर सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेक प्रवासी अडचणीत सापडले आहेत. परिणामी नॉन एसी गाड्यांवरील गर्दी आणखी वाढली आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. सीएसएमटीहून सायंकाळी ६.२६ वाजता सुटणारी पनवेल धीमी लोकल हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची असते; मात्र या गाडीतील सीएसएमटी बाजूचे तीन डबे महिलांसाठी राखीव असल्याने उर्वरित डब्यांवर प्रचंड ताण येतो. परिणामी प्लॅटफॉर्मवर लांब रांगा लागतात. गाडीत चढताना अडचणी निर्माण होतात आणि प्रवास अधिक त्रासदायक ठरतो. यातच सायंकाळी ६.३३ वाजता एसी लोकल गाडी येते. त्यामुळे साध्या लोकल प्रवाशांची गर्दी वाढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. त्यानंतरची ६.४१ वाजताची नॉन एसी लोकल दररोज १० ते १५ मिनिटे उशिरा धावत असल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी साचते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
...
नियोजनात संतुलन राखा!
पनवेलकडे प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांनी या परिस्थितीविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही मोहीम राबवली जात असून, एसी आणि नॉन एसी गाड्यांचे संतुलित नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सामान्य प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयींकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे आणि गर्दीच्या वेळेत पुरेशा नॉन एसी फेऱ्या चालवाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

धुमधडाक्यात पार पडलं 'कारभारी लयभारी' जोडीचं लग्न, अनुष्का-निखिलाच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ पाहिलेत का?

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

कुणासारखा दिसतो विकी कौशल- कतरिना कैफचा मुलगा विहान? आजोबा श्याम कौशल यांनी सांगितलं गुपित, म्हणाले- त्याचा चेहरा...

SCROLL FOR NEXT