सरकारी नोकरीनिमित्त
शेतकऱ्याची फसवणूक
मुंबई ः बांधकाम विभागात लिपिक पदावर नोकरी लावतो, असे प्रलोभन दाखवत नांदेड येथील शेतकऱ्याला साडेसात लाख रुपयांना फसवणाऱ्या व्यक्तींविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. श्रवण नरहरे असे शेतकऱ्याचे नाव असून त्याने मुलाला नोकरी मिळणार म्हणून शेतजमीन गहाण ठेवून आरोपींना पैसे दिले. विश्वनाथ गच्चे आणि मोरेश्वर चोरगे अशी आरोपींची नावे आहेत. गच्चे याने तक्रारदारास प्रलोभन दाखवत पैसे स्वीकारले. त्याने तक्रारदाराच्या मुलाची जी. टी. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून बनावट शासकीय नियुक्तीपत्र दिले. ही बाब उघड होताच तक्रारदार शेतकऱ्याने पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा गच्चेने ती रक्कम चोरगेला दिल्याचे सांगितले. चोरगे मंत्रालयात न्याय व विधी विभागात टंकलेखक असल्याचे गच्चे याने तक्रारदारास सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.