मुंबई

अन्नातून विषबाधेची शक्यता मावळली

CD

पायधुनी संशयास्पद मृत्यू प्रकरण

अन्नातून विषबाधेची शक्यता मावळली

जेजे रुग्णालयाकडून सूक्ष्मजीव अहवाल प्राप्त

मुंबई, ता. ६ : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी जेजे रुग्णालयाने सूक्ष्मजीव (मायक्रोबायोलॉजी) अहवाल पोलिसांना सुपूर्द केला. त्यात अन्नातून विषबाधेची शक्यता फेटाळण्यात आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.

डोकाडिया कुटुंबाचे रक्ताचे नमुने, बिर्याणी, कलिंगड इत्यादी अन्न नमुने आणि मृतदेहाच्या पोटातील नमुने (गॅस्ट्रिक सॅम्पल) इत्यादींच्या चाचणीत विषबाधेस कारणीभूत ठरणारे जीवाणू सापडले नाहीत, असे या अहवालात आहे. याप्रकरणी जेजे रुग्णालयासह अन्न व औषध प्रशासनालय आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विविध चाचण्या सुरू आहेत. पोलिसांच्या दाव्यानुसार यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल निर्णायक ठरेल. अद्याप तो प्राप्त झालेला नाही.
.....................

सामूहिक आत्महत्येची शक्यता

२६ एप्रिलला अब्दुल्ला डोकाडिया, पत्नी नसरीन, मोठी मुलगी आयेशा आणि धाकटी मुलगी जैनब यांचा मृत्यू झाला होता. अब्दुल्ला यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबानुसार, शनिवारी रात्रीच्या जेवणात अन्य कुटुंबीयांसह त्यांनी बिर्याणी घेतली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास चौघांनी कलिंगड खाल्ले. दरम्यान, या चाचण्यांमधून अन्नामुळे विषबाधा हे कारण फेटाळले गेल्यास हत्या किंवा सामूहिक आत्महत्या याच शक्यता उरतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Rajya Sabha Seat: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण जाणार? 'ही' नावे चर्चेत; पक्षातील महत्त्वाच्या पदांसाठीही फिल्डिंग

Latest Marathi News Live Update : पुण्यात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकीसह चोर पसार

Kolhapur crime news : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावानेचे केला अत्याचार, वडील मामाचेही अश्लील वर्तन; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Solapur Kidnapping: सोलापुरात १६ वर्षीय मुलीचे अपहरण; २१ दिवसांनंतरही शोध नाही, कुटुंबाचे उपोषण, हस्तक्षेप करणारे आमदार कोण?

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

SCROLL FOR NEXT