मुंबई

मुंबईतील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे डिसेंबर पर्यंत सुरु होणार

CD

मुंबईतील स्वयंचलित वाहन तपासणी
केंद्रे डिसेंबरपर्यंत सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता ७ : परिवहन संवर्गातील सर्व वाहनांची फिटनेस चाचणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांमार्फत (एटीएस) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहेत. एटीएस प्रणालीमुळे वाहन तपासणी प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित, संगणकीकृत आणि पारदर्शक होणार असून, मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने अचूकतेत वाढ होणार आहे.

परिवहन संवर्गातील सर्व वाहनांची फिटनेस चाचणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांमार्फत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता पारंपरिक मानवी तपासणी पद्धती बाद होणार आहे. मुंबई सेंट्रल आणि अंधेरी येथे वाहनांसाठी स्वतंत्र ऑटोमेटेड फिटनेस चाचणी केंद्र उभारणार आहे. वाहने रस्त्यावर चालण्यासाठी सुरक्षित आणि नियमांनुसार आहेत याची पडताळणी होईल.

या केंद्रात वाहनांची फिटनेस चाचणी स्वयंचलित उपकरणांच्या साहाय्याने केली जाणार आहे. केंद्र उभारणीचे काम पूर्ण होण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या केंद्रात डिसेंबरमध्ये वाहन तपासणी सुरू होईल. तोपर्यंत सध्याचीच प्रक्रिया सुरू राहील. वाहनधारकाकडून वारंवार मागणी करूनही फिटनेस तपासणीचा क्रमांक लवकर येत नाही, योग्य प्रकारे तपासणी केली जात नाही, अशा वाहनधारकांच्या अनेक तक्रारी आहेत. केंद्रामुळे वाहनांची फिटनेस प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिया सुलभ, विश्वासार्ह आणि गतीने होणे अपेक्षित आहे. ज्यामुळे वाहने रस्त्यावर चालण्यासाठी सुरक्षित आहेत आणि नियमांचे पालन करत आहेत, याची खात्री केली जाईल. हे फिटनेस केंद्र वाहनांच्या इंजिनची स्थिती, ब्रेक, लाइट, हॉर्न आणि स्ट्रक्चरल अखंडता यांसारख्या पैलूंची तपासणी करणार आहे. यांत्रिक उपकरणांचा वापर करून वाहनांच्या फिटनेस चाचण्या स्वयंचलित केल्या जाणार आहेत.
==
या केंद्रामुळे काय होणार?
व्यावसायिक, प्रवासी वाहनांची दर दोन वर्षांनी फिटनेस चाचणी
आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दरवर्षी फिटनेस चाचणी
संगणकाद्वारे वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र वाहनाच्या तपासणीसाठी ट्रॅकची गरज नाही
==
मुंबईत दोन स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (एटीएस) असणार आहेत. यापैकी मुंबई सेंट्रल येथे एटीएसचे काम सुरू करण्यात आले आहे. तर अंधेरीचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे वाहन तपासणी केंद्र डिसेंबरपर्यंत सुरू होतील.
- भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT