मुंबई

एसी लोकलमध्ये टीसींशी हुज्जत

CD

एसी लोकलमध्ये टीसींशी हुज्जत
प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट जलद एसी लोकलमध्ये सामान्य लोकलचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी पथकाने कारवाई केली. दंड भरण्यास नकार देत संबंधित प्रवाशांनी तिकीट तपासनीसांशी हुज्जत घालत गैरवर्तन केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विरारहून सायंकाळी ७.५१ वाजता सुटलेल्या चर्चगेट जलद एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरू असताना अंधेरी ते वांद्रे यादरम्यान सहा प्रवासी सामान्य लोकलचे तिकीट घेऊन एसी लोकलमध्ये प्रवास करताना आढळले. तिकीट तपासनीसांनी त्यांच्याकडे दंड भरण्याची मागणी केली असता संबंधित प्रवाशांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत गोंधळ निर्माण केला. यानंतर संबंधित प्रवाशांना दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उतरविण्यात आले; मात्र तेथेही त्यांनी तिकीट तपासनीसांसोबत वाद सुरूच ठेवला. अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
...
दंड वसूल
या कारवाईत तिकीट तपासनीस शुभम पाटीदार, दीपक सिंह आणि विष्णू ठाकूर यांनी प्रवाशांकडून एकूण २,१६० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT