मुंबई

मुंबईतील  पे अँड पार्किंग महागणार

CD

मुंबईतील  पे अँड पार्किंग महागणार 
महापालिकेचा ४० टक्के वाढीचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ७ :   मुंबई महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ प्रस्तावित केली असून मुंबईतील वाहन मालकांना लवकरच पालिकेच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 
याबाबत  पालिका एका अधिकाऱ्याने सांगितले, की या दरवाढीला अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) यांची मंजुरी आधीच मिळाली असून, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची मंजुरी बाकी आहे. त्यानंतर औपचारिक अधिसूचनेद्वारे अंमलबजावणी करण्यापूर्वी या प्रस्तावाला स्थायी समिती आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असेल. अधिकाऱ्यांनी सांगितले, की सुधारित दर मुंबईतील सर्व महापालिका पार्किंग सुविधांना लागू होतील, ज्यामध्ये सार्वजनिक पार्किंग लॉट्स (पीपीएल), ऑन-स्ट्रीट पे अँड पार्क आणि ऑफ-स्ट्रीट पे अँड पार्क सुविधांचा समावेश आहे. पार्किंग शुल्कात कोणत्याही प्रकारची वाढ झाल्यास लोक पार्किंगच्या जागा रिकाम्या करतात. श्रेणी बदलानंतर असे घडल्याचे आम्ही यापूर्वी पाहिले आहे. सध्याच जागांचा वापर ४० ते ६० टक्क्यांदरम्यान असतो. जर दरवाढ लागू झाली, तर व्यवसायात नक्कीच तोटा होईल, असे  एका पीपीएल कंत्राटदाराने सांगितले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले, की मंजुरीनुसार अंमलबजावणीस दोन ते सहा महिने लागू शकतात.
...
आधी सुधारणा हव्यात!
जोपर्यंत सुविधांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत दरवाढ योग्य आहे, असे मला वाटत नाही. सध्याच्या पार्किंग लॉट्सचे नियोजन अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे, असे सिटीझन ट्रान्स्पोर्ट कमिटीचे संस्थापक सदस्य जितेंद्र गुप्ता म्हणाले.
...
काय आहे प्रस्ताव ?
- पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ
- पीपीएल, ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पे अँड पार्क सुविधांना लागू
- सुधारित दर सध्याच्या आणि भविष्यातील करारांमध्ये समाविष्ट केले जातील
...
 आपल्याला रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आपल्याला खासगी मोटार वाहनांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. पार्किंग शुल्क वाढवण्यासारख्या अनेक उपायांमुळे हे साध्य करता येऊ शकते.
- सुधीर बदामी, वाहतूकतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT