मुंबई

ठाण्यात काेकणवासी १२ तास वेठीस

CD

ठाण्यात काेकणवासी १२ तास वेठीस
जनरल डब्यांसाठी प्रवासी रांगेत; रेल्वे-प्रवासी संघटनेत जुंपली

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ठाणे रेल्वे स्थानकावर कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांसाठी प्रवाशांना १२ ते १५ तास रांगेत थांबावे लागत आहे. यात गावी जाणाऱ्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल हाेत आहेत. या गैरसाेयीबाबत रेल्वे प्रशासनाच्या नियाेजनावर प्रवासी संताप व्‍यक्त करत आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, प्रवाशांना रांगेत घुसवण्यासाठी पैसे घेतले जात हाेते, असा खळबळजनक दावा ‘सकाळ’कडे केला आहे. यावर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आरोप फेटाळताना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यात जागा मिळविण्यासाठी प्रवासी रात्री ११.४५च्या गाडीसाठी पहाटेपासूनच रांगेत उभे राहत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते राजू कांबळे यांनी दिली. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. रात्री गाड्या पकडण्यासाठी अनेक महिला आदल्या दिवशीच स्थानक परिसरात थांबत असल्याचे दिसत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानक परिसरात बसून राहणाऱ्या महिला प्रवाशांसाठी पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनाही तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

कामाचे नुकसान, जेवणाचाही प्रश्न
जनरल डब्यात जागा मिळविण्यासाठी अनेक प्रवाशांना दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे कामाचे तास बुडत असल्याचाही फटका बसत आहे, शिवाय जेवण-पाण्याचीही गैरसोय होत आहे. काही प्रवासी कुटुंबासह स्थानकावरच ताटकळत बसलेले दिसत आहेत.
----
प्रवाशांची मागणी काय?
- कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी
- जनरल डब्यांसाठी स्वतंत्र आणि शिस्तबद्ध रांग व्यवस्था उभारावी
- महिला प्रवाशांसाठी अधिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी

पैसे वसुलीचा रेल्वेचा गंभीर दावा
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांत प्रवाशांना जागा देण्याच्या नावाखाली काही जणांकडून पैसे घेऊन रांगेत घुसवण्यात येत आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही पद्धत बंद केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
----
स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकणकन्या, मुंबई-मंगळूर एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांसाठी संघटनेकडून यादी तयार केली जात होती. गाडी आल्यानंतर त्या यादीनुसार प्रवाशांना शिस्तबद्ध पद्धतीने डब्यात बसविण्यास मदत केली जात होती.
- राजू कांबळे, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेेचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT