मुंबई

‘जीटीबी’च्या पुनर्विकासाचे पाऊल

CD

‘जीटीबी’च्या पुनर्विकासाचे पाऊल
प्रारूप बृहत आराखड्याचे सादरीकरण; म्हाडाचा या प्रकारचा पहिला प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या गुरू तेग बहादूर नगर (जी. टी. बी.नगर) समूह पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे. खासगी जमिनीवरील सी अँड डी मॉडेलअंतर्गत राबविण्यात येणारा म्हाडाचा पहिला प्रकल्प असून त्याच्या प्रारूप बृहत आराखड्याचे आज वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना सादरीकरण करण्यात आले.
म्हाडा मुख्यालयात आयोजित बैठकीमध्ये जी. टी. बी.नगर समूह पुनर्विकास प्रकल्पास वेग मिळावा, याकरिता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे साडेतीनशे झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी संजीव जयस्वाल यांनी संबंधित यंत्रणांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पात्र झोपडीधारकांची यादी प्रकाशित करण्याबाबत जयस्वाल यांनी संबंधितांना निर्देश दिले. दरम्यान, सादर केलेल्या पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रारूप बृहत आराखड्याबाबत जयस्वाल यांनी समाधान व्यक्त करतानाच तत्त्वतः मान्य केला आहे. आता सदरचा आराखडा पुढील कार्यवाहीसाठी उच्चाधिकार समितीकडे पाठविण्याबाबत जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या वेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, किस्टोन रिअलटर्सचे (रुस्तुमजी ग्रुप) व्यवस्थापकीय संचालक बोमन इराणी आदी उपस्थित होते.
...
विविध मुद्द्यांवर चर्चा
- या बैठकीदरम्यान पुनर्विकास प्रकल्पांतील १,२०० लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाबाबत रस्त्याबाबत येणाऱ्या अडचणी, म्हाडास मिळणारा गृहसाठा, पीएपी सदनिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
- प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नागरी विमानचालन प्राधिकरणाकडून उद्भवणाऱ्या अडचणींवरही या वेळी विचारविनिमय करण्यात आला.
- पुनर्वसनातील प्रकल्पबाधितांनाही योग्य देय लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT