मुंबई

राज्यात वाढतोय थॅलेसेमियाचा धोका

CD

जागतिक थॅलेसेमिया दिन
----------
राज्यात वाढतोय थॅलेसेमियाचा धोका
मुंबईत सर्वाधिक रुग्ण; राज्यातील रुग्णसंख्या १३ हजारांच्या पार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यात थॅलेसेमिया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची संख्या १३ हजारांपुढे गेली असून, एकट्या मुंबईत सर्वाधिक ३,४२० रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, मोफत जेनेटिक चाचण्या, एचएलए टायपिंग शिबिरे आणि औषधांचा पुरवठा वाढवून ‘थॅलेसेमियामुक्त भारत’ अभियानाला गती देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत सुरू आहे.

जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने राज्यातील थॅलेसेमिया नियंत्रण आणि उपचारासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेची माहिती दिली. ‘थॅलेसेमियामुक्त भारत’ या उद्दिष्टासह उपचार, तपासणी, जेनेटिक स्क्रीनिंग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधा मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या जात आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ९.५ लाख ते १७ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोल इंडिया निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून ८ मे २०२५ पासून आतापर्यंत राज्यातील ९० मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले आहेत. वेळेवर स्क्रीनिंग, विवाहपूर्व तपासणी, गर्भावस्थेतील जेनेटिक टेस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून आगामी काळात थॅलेसेमियाचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
---
१३.७२ लाख तपासण्या
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात एकूण १३ लाख ७२ हजार ४८९ एचपीएलसी आणि एचबी इलेक्ट्रोफोरेसीस तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये एएनसी तपासण्यांची संख्या दोन लाख तीन हजार ३४० इतकी होती.
--------
महाराष्ट्रातील थॅलेसेमियाची स्थिती
एकूण रुग्ण : १३,००३
सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३,४२०
पुणे - १,५०१
नागपूर - ६५०
छत्रपती संभाजीनगर - ६४१
नाशिक - ६०१
ठाणे - ५९३
जळगाव - ५०२
नांदेड - ५०२
अहिल्यानगर - ४४८
सांगली - ४१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT