पाेलिसांचे निरीक्षण
पत्नी किंवा मुलांचा अप्रामाणिकपणा, पत्नीचे विवाहबाह्य संबंध, त्यातून होणारी बदनामी, पत्नीकडून किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांकडून सतत होणारा अपमान, जात, हुद्दा, पगार, यश यावरून टोचून बोलणे, सतत व्यक्त होणारा संशय, कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न, प्रेमभंग किंवा नात्यात मिळालेला धोका आदी कारणे घटस्फोटासाठी कारणीभूत ठरतात. यामुळेच पुरुष आत्महत्येस प्रवृत्त हाेतात, असे निरीक्षण मुंबई पोलिस दलात कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले.
------
देशात दररोज २००हून अधिक पुरुष पत्नीच्या शारीरिक किंवा मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करतात. कायद्याचा दुरुपयोग हे अशा प्रकरणांत महिलांची बाजू भक्कम करतात. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने अध्यादेश काढून हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप झाल्यास सखोल चौकशी करूनच गुन्हा नोंदवावा, असे निर्देश पोलिसांना दिल्यामुळे अनेक विवाहित पुरुष वाचले.
- ॲड. धर्मेंद्र चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, पुरुष हक्क संरक्षण संघटना
----
आत्महत्या म्हणजे माघार घेणे किंवा अडचणींपासून दूर पळणे. पती असो किंवा पत्नी दोघांनी एकमेकांसोबत प्रामाणिक राहून, एकमेकांना समजून घेत संसार केल्यास ही परिस्थिती ओढवणार नाही.
- प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.