मुंबई

मुंबईच्या काही प्रभागांत आज पाणीपुरवठा बंद

CD

मुंबईच्या काही प्रभागांत आज पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ७ ः महापालिकेच्या डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १,६५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामाचे स्वरूप अत्यंत जटिल असल्याने शुक्रवारी (ता. ८) मुंबईतील काही प्रभागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
डी विभागात लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बालाराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, फालकलॅड रोड, पश्चिम रेल्‍वे, मुंबई सेंट्रल स्‍थानक, एम. पी. मिल्स कंपाउंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव, आंबेडकरनगर वसाहत, केशवराव खाड्ये मार्ग (दक्षिण), ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड तसेच ‘ई’ विभागात एम. एस. अली मार्ग, बेलासीस मार्ग, कामाठीपुरा, शंकरराव पुपला मार्ग, शुक्‍लाजी स्‍ट्रीट, मानाजी राजुजी मार्ग, मोरलॅड मार्ग, आग्रीपाडा मार्ग, सातरस्‍ता जंक्‍शन, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, एम. ए. मार्ग, डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर, कस्तुरबा, जगजीवन राम व वोक्हार्ट रुग्णालय परिसरात आणि जी दक्षिण विभागात सात रस्‍ता परिसर, जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, धोबीघाट, जी. बी. सपकाळ मार्ग, डॉ. ई. मोझोसमधील काही परिसर येथे पाण्याची ही समस्या असेल.
​पाणीकपातीच्या या काळात नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे. दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT