मुंबई

बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार

CD

बालपणापासूनच रुजणार वाहतूक शिस्तीचे संस्कार
ट्रॅफिक गार्डन्स उभारणार

मुंबई, ता. ८ : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला. यामध्ये मुंबईतील चार ट्रॅफिक गार्डन्सचा समावेश आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रत्येक उद्यान सुमारे एक एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. ही गार्डन्स सर्वांसाठी खुली असणार आहेत.
.............
‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधा

ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
...
पर्यावरणाचा संदेश
ट्रॅफिक गार्डन्समध्ये वृक्षलागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावल्या जाणार असून, त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्त्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. भविष्यात येणाऱ्या ई-वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
...
राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

Fish Farming : मच्छीमारीतून कोट्यवधींची कमाई! सरकारचा ९ हजार कोटींचा मोठा प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण योजना

SCROLL FOR NEXT