मुंबई

देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षड्‍यंत्र!

CD

देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षड्‍यंत्र
हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः देशभर दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. गुजरातप्रमाणे देशभर दंगली करून २०२९च्या निवडणुका जिंकायच्या हे षड्‍यंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, की भाजपने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू-मुस्लिम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधीशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे, हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशननंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
...
तमिळनाडूविषयी...
तमिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी, अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती. त्या वेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते; पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT