पाचव्या मिनिटाला हत्या, अपघाती मृत्यू
महाराष्ट्रात आकस्मिक मृत्यूचे प्रमाण अधिक
मुंबई, ता. ९ : राज्यात सरासरी दर पाचव्या मिनिटाला एका व्यक्तीची हत्या, आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू हाेतो, असे निरीक्षण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालात मांडले आहे. हत्या, आत्महत्या वगळता नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना आणि हृदयविकाराचा झटक्याने आकस्मिक मृत्यूंचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे.
ब्युरोच्या आकडेवारीनुसार, नैसर्गिक आणि अन्य कारणांमुळे २०२४मध्ये देशात चार लाख ६७ हजार नागरिकांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रात १६ टक्के म्हणजेच ७५,८०७ मृत्यूंची नोंद झाली आहे. २०२३च्या तुलनेत अपघाती, आकस्मिक मृत्यूंची संख्या सहा हजारांनी वाढली असून देशपातळीवर सरासरी दर लाख लोकसंख्येमागे ३३ मृत्यू असा आहे. महाराष्ट्रात हाच दर ५९ आहे. त्याच वेळी विविध कारणांमुळे २२,१७४ व्यक्तींनी आत्महत्या केली, तर २,२११ जणांची हत्या झाली आहे. या तिन्ही प्रकारांतील मृत्यू एक लाखापेक्षा जास्त आहे.
बुडून, पडून १० हजार मृत्यू
महाराष्ट्रात उघडी गटारे, खड्डे, तलाव, नदीपात्रात पडून गंभीर जखमी झालेल्या, उंचावरून पडून १० हजारांहून अधिक व्यक्तींच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. सर्वाधिक विमाने, बोटींचे अपघात आणि आगीच्या सर्वाधिक घटनाही महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत.
हृदयविकाराचे बळी जास्त
हृदयविकाराचा झटका किंवा अचानक प्रकृती खालावल्याने झालेला मृत्यू अपघाती म्हणून गणला जातो. राज्यभरात ३६ हजार रस्ते, रेल्वे अपघातात १९ हजार ४७५ मृत्यू झाले. यापेक्षा जास्त मृत्यू अचानक प्रकृती खालावून झालेल्या मृत्यूंची संख्या २५ हजारांवर आहे. त्यात १५ हजार मृत्यू हे हृदयविकाराने झाल्याचे ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.