मुंबई

ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी

CD

ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी
रेल्वेमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या उपनगरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाचा विस्तारित आराखडा आणि वाढलेल्या बांधकाम खर्चामुळे आता या स्थानकाची अंदाजित किंमत २४५ ते २५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. रेल्वे बोर्डाकडून आर्थिक तरतुदीस मान्यता मिळाल्यानंतर आता निविदा प्रक्रिया आणि पुढील प्रशासकीय हालचालींना वेग मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावित स्थानकात तीन प्लॅटफॉर्म, आधुनिक प्रवासी सुविधा, एस्कलेटर, लिफ्ट तसेच सॅटिस डेकची उभारणी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
...
आनंद दिघेंच्या नावाची मागणी
ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या उपनगरी रेल्वे स्थानकाचा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या नव्या स्थानकाला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून, त्यास ठाणे महापालिकेनेही मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT