मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांची मुक्कामी गैरसोय

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : एसटी बससेवा देणाऱ्या चालक व वाहकाला रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी राहण्यासाठी असुविधा मिळत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून मुक्कामी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वी मिळत असलेले सहा सीटर पाळणे बंद, तर नवीन गाड्यांची शिडी काढल्याने टपावर झोपता येत नाही. त्यामुळे दोन्ही सीटच्या मध्ये झोपावे लागत आहे

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढले आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली, तर पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतून जाणाऱ्या १७ पैकी अनेक गावांत सोयीसुविधांची वानवा आहे. काही गावांमध्ये झोपण्याची सुविधा नसल्याने गाडीतच झोपावे लागते. या गाड्यांमध्ये चालक-वाहकांना डास फोडून काढतात. शौचालय नाही, झोपण्याची सोय नाही, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांपैकी केळवणी, वाशिवली, भवरा, न्हावा, वडगाव, वेळास उतंबर, या सारख्या अनेक गावांत सोयीसुविधा नाहीत. राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने इतबारे काम करत आहेत.

मुक्कामी गाडी जाणारी अनेक गावे ही डोंगरमाथ्यावर आहेत. त्या ठिकाणी बिबट्यासह इतर प्राण्यांचा वावर असतो. इतकेच त्या ठिकाणी सापही निघतात, त्यामुळे चालक-वाहकांना तिथे जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागते. एसटी बस ज्या गावात रात्री वस्तीला असते, त्या ग्रामपंचायत प्रशासनाने चालक-वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असून, या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

खेडेगावात मुक्कामी गेल्यानंतर काही ठिकाणी ग्रामपंचायत सोय करते; मात्र इतर ठिकाणी सोय नसल्याने गाडीत झोपावे लागते. पूर्वी आतमध्ये सहा सीटर पाळणे होते, आता ते बंद झाल्याने दोन्ही सीटच्या मध्ये झोपावे लागते. शिडी काढल्याने वरती टपावरसुद्धा झोपता येत नाही.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी स्थानिक पातळीवर व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना विभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. मुक्कामाची ठिकाणे इतर राज्यात असतील, तर त्या ठिकाणी अतिथीगृहाची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचा वापर चालक-वाहक करतात.
- नितीन मैंद, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT