मुंबई

आजपासून दुसऱ्या संधीसाठी पीसीबी समूहाची सीईटी प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या अधिक

CD

आज पीसीबी समूहाची सीईटी प्रवेश परीक्षा
विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक
मुंबई, ता. ९ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीबी समूहासाठीची दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा १० व ११ मे दोन दिवस सकाळी व दुपारी अशा दोन बॅचनुसार घेण्यात येणार आहे. ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होत आहे. पीसीबी समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यांतील १९१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी पीसीबी समूहासाठीची सीईटीच्या दोन संधी मिळत आहेत. यातील पहिल्या संधीची सीईटी २१ ते २६ एप्रिलला झाली आहे. राज्यात पहिल्या संधीच्या सीईटीसाठी दोन लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ६३ हजार २०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या पीसीबी समूहाच्या सीईटी परीक्षेला ९२.६५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन) दोन प्रवेश परीक्षा होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षापासून सीईटी कक्षाने या वर्षापासून प्रथमच एमएचटी सीईटी (पीसीएम समूह), एमएचटी सीईटी (पीसीबी समूह) व एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करतानाच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे ठरविले आहे. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्या, तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल असलेला निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल.

यावर्षी पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी एक लाख १६ हजार ५४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये ४३,६११ विद्यार्थी, ७२,९२८ विद्यार्थिनी व दोन तृतीयपंथी पीसीबी समूहाची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ही सीईटी परीक्षा देणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनीची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा २९ हजार ३१७ ने जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

SCROLL FOR NEXT