मुंबई

​‘गिल्बर्ट हिल’चा विकास धारावी मॉडेलनुसार?

CD

​‘गिल्बर्ट हिल’चा विकास धारावी मॉडेलनुसार?

रहिवाशांचा ३५० चौरस फुटांच्या घरासाठी आग्रह

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या १९ मोठ्या समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अंधेरी पश्चिम येथील ऐतिहासिक गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार आहे. सुमारे १०१ एकर क्षेत्रावरील या भागाचा पुनर्विकास ‘धारावी मॉडेल’नुसार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
​राज्य सरकारच्या ११ नोव्हेंबरच्या निर्णयानुसार, मुंबईतील झोपडपट्ट्या आणि जीर्ण इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण’ याला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या महाकाय प्रकल्पात गिल्बर्ट हिल परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसन नियोजित आहे. नगरसेविका मेहर हैदर यांनी या पुनर्विकासाबाबत महासभेत विशेष प्रस्ताव मांडला आहे.
​केवळ निवासस्थानच नव्हे, तर या प्रकल्पात एकात्मिक पायाभूत सुविधा, रुंद रस्ते आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मोकळ्या जागा विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळाधारक आणि इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या रहिवाशांच्या हितासाठी विशेष कायदेशीर तरतुदींचा समावेश या प्रस्तावात आहे. ​यासंदर्भातील प्रस्तावावर गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत चर्चा होणार आहे. त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे गिल्बर्ट हिल परिसरातील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
.............
या सवलतींची मागणी
- २००० पूर्वीच्या रहिवाशांना ३५० चौरस फुटांचे मोफत घर मिळावे.
- ​२००० ते २०११ दरम्यानच्या रहिवाशांना ३०० चौरस फुटांचे घर सवलतीच्या दरात मिळावे. ​- २०११ नंतरच्या रहिवाशांसाठी भाडेतत्त्वावर घरांची सोय असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात अव्यवस्थेचा कळस; प्रयोग रद्द करण्याची नामुष्की, ध्वनीव्यवस्थेत बिघाड अन् वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त..

Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

कोण आहेत कीर्तना? २९ वर्षीय सर्वात तरुण मंत्री, हिंदीसह ५ भाषा येतात; विजय यांच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला

Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून सुनेनं प्रसिद्ध डॉक्टर सासऱ्यांना संपवलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT