मुंबई

पारशी समाजाचे राष्ट्र उभारणीत योगदान!

CD

पारशी समाजाचे राष्ट्र उभारणीत योगदान!
किरेन रिजिजू : मुंबई विद्यापीठात ‘अवस्ता’ भाषेचा स्वतंत्र विभाग

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ९ : ‘पारशी समाज संख्येने अल्प असला तरी राष्ट्र उभारणीत आणि देशाच्या जीडीपीत या समाजाचे योगदान सर्वात मोठे आहे. या समाजाची संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. पारशींची प्राचीन ‘अवस्ता’ भाषा टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठात पाली आणि प्राकृत भाषेप्रमाणेच स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येईल,’ अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज येथे केली.

​भारत सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘पारसीज इन मॉडर्न इंडिया : नेव्हीगेटिंग कल्चर अँड सोशाे-इकॉनोमिक पाथवे’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानावरून रिजिजू बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान आदी मान्यवर उपस्थित होते.

रिजिजू पुढे म्हणाले, की ‘पारशी समाजात अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी भारताच्या विकासाचा पाया रचला. सध्या या समाजाच्या लोकसंख्येत होणारी घट चिंतेचा विषय आहे. ‘जिओ पारशी’सारख्या योजनांद्वारे सरकार मदत करत असून त्यांची भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शैक्षणिक स्तरावर प्रयत्न केले जातील.’
‘यंदा मुस्लिम समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. ही संख्या मलेशिया किंवा इंडोनेशियासारख्या देशांच्या लोकसंख्येइतकी असू शकते,’ असे भाष्यही त्यांनी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर केले.
या परिसंवादात पहिल्या सत्रात पारशी सांस्कृतिक ओळख आणि वारसा जतनावर डॉ. मेहर मिस्त्री आणि टिनाझ नूशियन यांनी विचार मांडले. दुसऱ्या सत्रात सामाजिक-आर्थिक आव्हानांवर दिनशॉ तांबोली आणि प्रा. शालिनी भारत यांनी मार्गदर्शन केले. या वेळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे कुलगुरू प्रा. बद्रीनारायण तिवारी, होर्माझ्द गोदरेज यांच्यासह देशभरातील १५० प्रतिनिधी उपस्थित होते.
......
अल्पसंख्याक सुरक्षित
रिजिजू म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात भारतातील अल्पसंख्याक समाज सर्वाधिक सुरक्षित आहे. काही लोक असुरक्षिततेचा खोटा अजेंडा राबवत आहेत; मात्र आसपासच्या देशांतील अल्पसंख्याक आजही भारतातच आश्रय घेतात, हे वास्तव आहे.’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

हा कसला एन्काउंटर? गाडीतून नेताना २ गोळ्या झाडल्या, एक प्रायव्हेट पार्टमध्ये; आईचा गंभीर आरोप, पोलिसांवर गुन्हा दाखल

केतनशी लग्न ठरल्यानंतर सियाचे चेतनला २००४ कॉल, 238 तास बोलणं; CDRमधून धक्कादायक माहिती

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT