मुंबई

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला; राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३९ अंश तापमानाची नोंद

CD

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला
​उपनगरात उष्णतेची लाट कायम; आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ९ : राजधानी मुंबईत उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शनिवारी (ता. ९) मुंबईतील विविध भागांत तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, राम मंदिर परिसरात सर्वाधिक ३९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, उपनगरातील विक्रोळी भागातही पारा ३८.८ हॅलोपर्यंत पोहोचला होता. इतर भागांतील कमाल तापमानाची स्थिती पाहिल्यास ​सर्वाधिक राम मंदिर ३९.० अंश सेल्सिअस,​ विक्रोळी : ३८.८, ​टाटा पॉवर (चेंबूर) ३६.६, विद्याविहार ३५.७,​ दहिसर ३५.७ आणि ​वांद्रे: ३५.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझ आणि कुलाबा या मुख्य वेधशाळांमध्येही सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ (उपनगर) येथे कमाल तापमान ३५.६ हो सेल्सिअस आणि आर्द्रता ५८ टक्के नोंदवली गेली.
​कुलाबा (शहर) परिसरात कमाल तापमान ३४.४ हो सेल्सिअस आणि आर्द्रता ५० टक्के इतकी होती.

काळजी घेण्याचे आवाहन
तापमानासोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ५० ते ५८ टक्क्यांच्या दरम्यान राहिल्याने मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा आणि दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
........
काही परिसरातील तापमान : (अंश सेल्सिअसमध्ये)
राम मंदिर : ३९.०
​विक्रोळी : ३८.८
​टाटा पॉवर (चेंबूर) : ३६.६
​विद्याविहार : ३५.७
​दहिसर : ३५.७
​वांद्रे : ३५.४
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT