ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक
मुंबई, ता. ९ : ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल ‘व्ही.जे.टी.आय.’ने दिला आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २० कोटी पाच लाख १८ हजार रुपये खर्च करणार आहे. महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या विभागामार्फत जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी पश्चिम उपनगरांत सल्लागार म्हणून मे. एससीजी कन्सल्टिंग सर्विसेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. मे. एससीजी कन्सल्टिंग सर्विसेस यांनी पालिकेस दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालाच्या तपासाअंती वाहतूक पुलाचा स्लॅब हा धोकादायक असल्यामुळे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर या पुलाचे व्ही.जे.टी.आय. ऑडिट केले. व्ही.जे.टी.आय. यांच्या पुनःपरीक्षण अहवालानुसार या पुलाच्या सुपरस्ट्रक्चरचे पाडकाम करून पुनर्बांधणी करणे व सबस्ट्रक्चरची मोठी संरचनात्मक दुरुस्ती करणे, असे प्रस्तावित केले. त्यानुसार आता जुना पूल पाडून नवीन बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.