मुंबई

नवघर-बालवली रस्त्यासाठी ३२ हजार कोटी

CD

विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर प्रकल्प : किकर

नवघर-बालवली रस्त्यासाठी ३२ हजार कोटी

राज्य सरकारची खर्चास मंजुरी; तीन वर्षांची मुदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नवघर-बालवली या ९६ किलोमीटरच्या रस्ते बांधणीवर तब्बल ३१ हजार ७९३ कोटी रुपये खर्च होणार आहे. या खर्चास राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली असून प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे. हे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण करावे लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग मल्टिकाॅरिडाॅर वाहतूक प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या काॅरिडाॅरची १२६.६ किमी लांबी असणार असून त्यापैकी वसई येथील नवघर येथून मौजे बालवली (पेण)पर्यंतचा ९६.४१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम केले जाणार आहे. त्यानुसार ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्रकल्प करण्यास मंजुरी देणे, प्रकल्पाच्या बांधकाम खर्चास प्रशासकीय मान्यता, एमएसआरडीसीला कार्यान्वयीन संस्था म्हणून मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार राज्य सरकारने २१ हजार ५३३ कोटी रुपयांच्या बांधकाम खर्चासह इतर खर्च मिळून ३१ हजार ७९३ कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) या तत्त्वावर एमएसआरडीसीमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.

या खर्चाला मंजुरी
- बांधकाम खर्च : २१,५३३ कोटी
- भाववाढ खर्च (एस्केलेशन) : २,५२४ कोटी
- आकस्मिक खर्च : ६०२ कोटी
- पूर्व परिचलन खर्च : २२१ कोटी
- वित्तीय खर्च : १९० कोटी
- बांधकामावरील जीएसटी : ४,३३० कोटी
- सेवांवरील जीएसटी : ७४ कोटी
- बांधकाम कालावधीतील व्याज : २,२६८ कोटी
- विमा : ४७ कोटी
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT