मुंबई

शिवसेना पक्षबांधणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा; २२ जिल्ह्यांत साधणार थेट संवाद

CD

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा
शिवसेना पक्षबांधणीसाठी २२ जिल्ह्यांत साधणार थेट संवाद
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १० : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथ स्तरापर्यंत अधिक सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा १६ मेपासून राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे.
१६ मे ते १५ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत ते राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या दौऱ्याची घोषणा केली.
​शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन बळकटीकरणावर भर दिला आहे. यापूर्वी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातही दौरे केले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही त्यांनी ६५ हून अधिक मतदारसंघांत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती.
या दौऱ्यात मोठ्या सभांऐवजी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संघटनात्मक आढाव्यावर भर दिला जाणार आहे. प्रामुख्याने ‘एसआयआर’ मोहिमेअंतर्गत बूथ प्रमुखांच्या नियुक्त्या बीएलए सक्षमीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती यावर सविस्तर चर्चा होईल. यात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांपासून ते थेट शाखाप्रमुख आणि बूथ स्तरावरील शिवसैनिकांच्या सूचना ऐकून घेतल्या जातील.

सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून
​मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला. ​जून महिना जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. ​जुलै महिना बुलडाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा दौरा असणार आहे.
​तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक भक्कम करणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT