मुंबई

पदव्युत्तरचे वेळापत्रक जाहीर

CD

पदव्युत्तरचे वेळापत्रक जाहीर
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; ३ जूनला पहिली गुणवत्ता यादी


मुंबई, ता. १० : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेली ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ९ मे २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा यामध्ये समावेश आहे. विद्यापीठाच्या https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी ३ जूनला जाहीर करण्यात येईल.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. एआयसीटी अंतर्गत असलेल्या एमएमएस, एमसीए, एमटेक आणि एमई या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी पदवीची ३ वर्षे पूर्ण केली आहेत, अशा विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षांसाठी (ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च) साठी प्रवेश घेता येईल. राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT