मुंबई

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरण; सुरक्षेसाठी तैनात शिपाई बडतर्फ

CD

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; सुरक्षेसाठी तैनात शिपाई बडतर्फ

मुंबई, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस शिपायास पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. श्याम सोनवणे असे या शिपायाचे नाव आहे. सुरक्षा व संरक्षण विभागातर्फे सिद्दीकी यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा ताफ्यात सोनवणे यांची नियुक्ती होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये निर्मलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सोनवणे यांना निलंबित करण्यात आले. त्यांचे वर्तन पाहता विभागीय चौकशीदरम्यान त्यांना बडतर्फ का करू नये, अशी विचारणा केली गेली. उत्तर समाधानकारक नसल्याने बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT