मुंबई

शेअर ट्रेडिंगच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक

CD

शेअर ट्रेडिंगच्या प्रलोभनाने वृद्धाची फसवणूक

मुंबई, ता. १० : फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे मध्य मुंबईत राहणाऱ्या ८२ वर्षांच्या वृद्धाला सायबर भामट्यांनी सुमारे ५० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार वृद्धास मार्चमध्ये नामांकित बँकेची गुंतवणूक प्रतिनिधी असल्याचे भासवत एका महिलेने संपर्क साधला, आपल्या बँकेमार्फत गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा मिळवून देऊ, असे प्रलोभन दाखवले. लगोलग वृद्धाला एका व्हॉट्सॲप समूहात सहभागी करून घेण्यात आले. या समूहावर शेअर बाजारात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोडी, बारकावे आदी तपशील दिले जात होते. तसेच अन्य सदस्य या मार्गदर्शनामुळे नफा झाल्याचे संदेश समूहावर देत होते. त्यामुळे वृद्धाचा विश्वास बसला. पहिल्या टप्प्यात वृद्धाने २५ हजार रुपये गुंतवले. त्यावर नफा झाल्याचे वृद्धाच्या बँकेच्या नावे तयार करण्यात आलेल्या ॲपवर दिसले. शिवाय, एक हजार रुपये वृद्धांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे वृद्धाने पुढील तीन आठवड्यांत तब्बल ४९.२४ लाख रुपये गुंतवले. त्यावरील नफा काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणखी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. वृद्धाने घराजवळील बँक शाखेत चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT