एल.एल.एम. सीईटी परीक्षेच्या
प्रवेश अर्जास १५ मेपर्यंत मुदतवाढ
मुंबई, ता. १० : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी घेण्यात येणाऱ्या एल.एल.एम. कॉमन एंट्रन्स टेस्ट (एलएल.एम. सीईटी) परीक्षेच्या प्रवेश अर्जास १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत किवा ज्यांचे अर्ज अपूर्ण राहिले आहेत, अशा इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘Online LL.M. CET Exam – 2026-27’ येथे क्लीक करून ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
या प्रवेश प्रक्रियेसाठी एल.एल.बी. पदवी उत्तीर्ण झालेले, तसेच तीन किंवा पाच वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही परीक्षा ‘सेंटर बेस्ड ऑनलाइन’ पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकरच मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
सामान्य प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क रुपये १,००० (सुविधा शुल्क व जीएसटीव्यतिरिक्त) तर राखीव प्रवर्गासाठी रुपये ६५० (सुविधा शुल्क व जीएसटीव्यतिरिक्त) असे निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क परत न होणारे आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष व इतर सविस्तर माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.