मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा!
१५ मेपासून १० टक्के कपात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात झालेली घट आणि आगामी पावसाळ्याबाबतचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेत महापालिकेने संपूर्ण मुंबईत शुक्रवारपासून (ता. १५) १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांतील आजचा साठा तीन लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लिटर इतका आहे. मुंबईची पाण्याची वार्षिक गरज १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. भातसा धरणातून १,४७,०९२ दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणातून ९०,००० दशलक्ष लिटर अतिरिक्त साठा मिळणार असल्याने सध्या घाबरण्याचे कारण नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे; मात्र वाढते तापमान, बाष्पीभवन आणि ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजनावर भर दिला आहे.
...
नागरिकांना आवाहन
मुंबईचा पाणीसाठा सध्या नियोजित मर्यादेत असला तरी भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत ही कपात लागू राहील. मुंबईकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
...
इतर भागांवरही परिणाम
पालिकेची १० टक्के पाणीकपात केवळ मुंबई शहरातच नव्हे, तर पालिकेमार्फत पाणीपुरवठा होणाऱ्या इतर क्षेत्रांतही लागू असेल. ठाणे महापालिका क्षेत्र, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि पालिकेच्या जलवाहिन्यांवरून पाणीपुरवठा होणारी इतर गावे यांनाही या कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
...
नागरिकांना सूचना
- आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करा.
- नळ सुरू ठेवून दाढी किंवा ब्रश करणे टाळा.
- वाहने धुण्यासाठी पाइप न वापरता ओल्या कापडाने पुसून घ्या. लादी धुण्याऐवजी पुसून घ्या.
- नळांना पाण्याचा प्रवाह मर्यादित करणारी नोझल्स लावा, ज्यामुळे ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते.
- सोसायट्यांनी आपल्या टाक्या आणि जलवाहिन्या तपासाव्यात आणि पाणी ओसंडून वाहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- ग्राहकांना विचारल्याशिवाय पाणी देऊ नये, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.