मुंबई

व्हिडीओ कॉलवर वडिलांदेखत तरुणीची आत्महत्या

CD

व्हिडिओ कॉलवर वडिलांदेखत तरुणीची आत्महत्या
वडिलांच्या संशयी स्वभावाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप

मुंबई, ता. ११ : वडिलांच्या संशयी स्वभावाला कंटाळून फॅशन डिझायनिंग विषय शिकणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने वरळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या देखत तिने गळफास घेतला. ते दृश्य पाहून वडिलांनी हसत-हसत टाळ्या वाजवत आता हिच्या आईचा काटा काढणार, अशी वल्गना केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तरुणीच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंदविला. ही घटना १ मे रोजी घडली. मृत तरुणीच्या मामाने हा प्रकार मुलीच्या आईला सांगितल्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ५ मे रोजी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्वप्नाली घेवारी असे मृत तरुणीचे नाव असून, ती खारघरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी येथे शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नाली मूळची पुण्याच्या मंचर तालुक्यातील आंबेगावची रहिवासी आहे. तिचे वडील सुनील हे शेतकरी आहेत. स्वप्नाली गेल्या चार महिन्यांपासून वरळी येथील महालक्ष्मी इमारतीत अन्य दोन तरुणींसह भाड्याने वास्तव्यास होती. सुनील यांचा स्वभाव संशयी होताच. मात्र, त्यांना दारूचे व्यसनही होते. त्यामुळे त्यांचे आणि पत्नी स्वाती यांच्यात वरचेवर वाद होत. त्यास कंटाळून स्वाती या एप्रिल अखेरीस स्वप्नालीकडे राहण्यासाठी आल्या. त्यानंतर त्या काही दिवस त्यांच्या विवाहित बहिणीकडे राहण्यासाठी गेल्या. १ मे रोजी रात्री त्यांना स्वप्नालीने वरळी येथील निवासस्थानी गळफास घेतल्याचे समजले. मात्र, तेव्हा मानसिकरीत्या खचल्यामुळे पोलिसांना दिलेल्या जबाबात कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी सांगितले.

भावाने दिली माहिती
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर स्वाती यांच्या भावाने स्वप्नाली हिने वडील सुनील यांच्या संशयी स्वभाव, त्यातून सतत खोचक संवाद, आरोप आदी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. आत्महत्येपूर्वी सुनील आणि स्वप्नाली यांच्यात फोनवरून वाद झाले. त्यानंतर स्वप्नालीने व्हिडिओ कॉल करत वडिलांच्या देखत गळफास घेतला. गळफास घेतल्यानंतर सुनील यांनी स्वाती यांचे माहेर गाठून त्यांच्या भावाला हा प्रकार हसत-हसत सांगितल्याचा आरोप करण्यात आला. त्याआधारे स्वाती यांनी तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT