अंधारेंची विशेषाधिकार
समितीसमोर साक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सोमवारी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हक्कभंगप्रकरणी साक्ष नोंदविण्यात आली.
या वेळी विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंधारे या सुनावणीस उपस्थित राहू शकल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड म्हणाले, की ‘यापूर्वी याच प्रकरणात कुणाल कामरा यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांचाही या प्रकरणात समावेश होता. त्यामुळे आज त्यांची साक्ष नोंदवून क्रॉस प्रश्न करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान समिती सदस्यांनी सुमारे २२ ते २३ प्रश्न विचारले. आमदार अनिल परब आणि मनीषा कायंदे यांनीही प्रश्न विचारले.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.