मुंबई

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती

CD

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती
धावत्या ट्रेनमध्ये घुमला चिमुकलीचा पहिला आवाज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : लोकमान्य टिळक टर्मिनसहून भुसावळकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये रविवारी (ता. १०) एका महिलेची प्रसूती झाली. प्रचंड गर्दीच्या जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि एका परिचारिकेच्या मदतीमुळे धावत्या ट्रेनमध्येच महिलेची सुखरूप प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

ट्रेन क्रमांक २२५३८ कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये आर. एस. तेली हे सीटीआय (मुख्य व्यावसायिक कम तिकीट निरीक्षक) म्हणून एलटीटी ते भुसावळदरम्यान कर्तव्यावर होते. कल्याण स्थानकानंतर एका प्रवाशाने जनरल डब्यातील गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याची माहिती त्यांना दिली. डब्यात प्रचंड गर्दी असल्याने महिलेची अवस्था अधिकच बिकट होत होती. तेली यांनी क्षणाचाही विलंब न करता काही प्रवाशांच्या मदतीने महिलेला कसारा स्थानकात ए-१ डब्याच्या मोकळ्या जागी आणले. या वेळी ट्रेनमध्ये प्रवास करणारी एक परिचारिका मदतीसाठी पुढे आली. तिच्या साहाय्याने धावत्या ट्रेनमध्येच महिलेची प्रसूती करण्यात आली. काही क्षणांतच चिमुकलीचा पहिला आवाज संपूर्ण डब्यात घुमला आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेची माहिती तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर इगतपुरी स्थानकात रुग्णवाहिका, डॉक्टर, स्ट्रेचर आणि रेल्वे अधिकाऱ्यांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली.

दोघांची प्रकृती स्थिर
कुशीनगर एक्स्प्रेस इगतपुरीत पोहोचताच आई आणि नवजात बालिकेला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांची संवेदनशीलता, प्रवाशांचे सहकार्य आणि परिचारिकेच्या तत्परतेमुळे धावत्या ट्रेनमध्ये एका नव्या जीवाचे सुरक्षित आगमन झाल्याने प्रवाशांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT