मुंबई

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?

CD

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का?
राज यांचा मोदींवर पत्राद्वारे घणाघात

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतीयांना सोने खरेदी, पेट्रोल-डिझेलचा वापर आणि परदेश दौरे टाळून काटकसर करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या या आवाहनातील विरोधाभास उघडा पाडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का,’’ असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
पंतप्रधानांनी इराण युद्ध आणि विदेशी गंगाजळीचे कारण देत जनतेला निर्बंध पाळण्यास सांगितले आहे. यावर राज ठाकरे यांनी ऐतिहासिक दाखले देत प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘२००८, २०११ आणि २०१४ च्या काळातही आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ९० ते १०० डॉलर्स प्रतिबॅरल होते. तेव्हा मनमोहन सिंग किंवा खुद्द मोदींनी असे काटकसरीचे आवाहन केले नव्हते; मग आताच हे कशासाठी,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जेव्हा तेलाचे भाव ६० डॉलर्स होते, तेव्हा चढ्या दराने पेट्रोल विकून कमावलेले लाखो कोटी रुपये कुठे गेले, असा हिशोबही त्यांनी मागितला आहे.
​...
राज लिहितात...
- पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी देशभर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणुका काढतात, स्वतःवर फुले उधळून घेतात, तेव्हा पेट्रोल आणि पैसा वाया जात नाही का?
- निवडणुकांच्या रोड शोमध्ये आणि प्रचारात होणारा अफाट खर्च आणि इंधनाची नासाडी सरकारला का दिसत नाही?
- पंतप्रधानांनी ज्या मोफत योजनांच्या (रेवडी) संस्कृतीवर टीका केली होती, त्याच योजना राबवून निवडणुका जिंकल्या जात आहेत.
- महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. महिलांना सक्षम करण्याऐवजी तुटपुंजे पैसे द्यायचे आणि महागाई वाढवून ते पुन्हा काढून घ्यायचे, हे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणारे आहे.
- गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
- शिक्षण क्षेत्रात मूलभूत गुंतवणूक करण्याऐवजी केवळ हिंदी लादण्यावर भर दिल्याने तरुणवर्ग परदेशात जात आहे.
- पंतप्रधान १५ मेपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांनी स्वतःचे दौरे थांबवून मगच जनतेला आवाहन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT