मुंबई

पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ

CD

पंतप्रधानांच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ
अमित साटम यांचा २५ गाड्यांचा ताफा

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन करून दोन दिवस उलटत नाहीत, तोच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या शिस्तीला हरताळ फासला आहे. मुंबईतील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी साटम यांनी चक्क २५ गाड्यांचा अवाढव्य ताफा वापरल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. ‘जनतेला त्यागाचे सल्ले आणि स्वतःला मात्र शाही थाट,’ अशा शब्दांत विरोधकांनी साटम यांच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा केला आहे.
​अमित साटम यांनी मंगळवारी (ता. १२) मुंबई उपनगरांमध्ये नालेसफाईचा आढावा घेतला. या दौऱ्याचे स्वरूप एखाद्या राजकीय मिरवणुकीसारखे होते. साटम यांच्या स्वतःच्या वाहनांसह या ताफ्यात आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची लांबलचक रांग होती. एका बाजूला सामान्य नागरिक महागाई आणि इंधन दरवाढीने होरपळत असताना सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नालेसफाईसारख्या कामासाठी अशा प्रकारे इंधनाची उधळपट्टी करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर टीका करताना सत्ताधाऱ्यांच्या गाड्यांच्या ताफ्याचा उल्लेख केला आहे. साटम यांच्या या २५ गाड्यांच्या दौऱ्याने राज ठाकरेंची टीका कशी रास्त आहे, हेच सिद्ध झाले आहे.
...
विरोधकांचे टीकास्त्र
या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) अमित साटम यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ‘पंतप्रधानांचा सल्ला फक्त सामान्य माणसानेच पाळायचा का, साटम यांना इंधन बचतीचा विसर पडला आहे की ते सत्तेच्या नशेत आहेत,’ असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारला, तर रोहित पवार यांनी साटम यांच्या ताफ्यावर खोचक टिप्पणी करत, ‘बहुधा यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात,’ असा टोला लगावला.
​...
​समर्थन करताना दमछाक!
टीकेनंतर अमित साटम यांनी ‘आमचा दौरा वसुलीसाठी नाही तर सुरक्षेसाठी आहे,’ असा दावा केला असला, तरी २५ गाड्यांच्या ताफ्याचे समर्थन करताना त्यांची दमछाक होताना दिसली. नालेसफाईच्या पाहणीत पारदर्शकता आणण्याऐवजी साटम यांनी या अवाढव्य लवाजम्यासह केवळ शक्तिप्रदर्शन केल्याची टीका सामान्य मुंबईकरांकडूनही केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT