बनावट ई-मेलद्वारे ३२ लाखांची फसवणूक
मुंबई, ता. १२ : बनावट ई-मेलद्वारे (मॅन इन मिडल) शहरातील एका कंपनीची ३२ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या भामट्याविरोधात सायबर पोलिसांनी (मध्य विभाग) सोमवारी (ता. ११) गुन्हा नोंदवला. तक्रारदार कंपनीचे कार्यालय शिवडी परिसरात आहे. या कंपनीची उत्पादने परदेशात मागणीप्रमाणे निर्यात केली जातात. उत्पादन घेण्यासाठी आवश्यक कच्चा माल ही कंपनी थायलंड येथील कंपनीकडून घेते. गेल्या वर्षभरापासून या दोन कंपन्यांमध्ये व्यवहार सुरू होते. प्रामुख्याने हे व्यवहार ई-मेल आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण केले जात होते. अलीकडेच तक्रारदार कंपनीने कच्चा माल पाठविण्याबाबत थायलंडच्या कंपनीसोबत चर्चा सुरू केली. दरम्यान, गेल्या महिन्यात भामट्याने थायलंड येथील कंपनीशी मिळत्या-जुळत्या ई-मेल आयडीवरून बनावट पण तंतोतंत खरे भासेल, अशा लेटरहेडवरून अन्य बँकेचे तपशील पाठवले आणि त्यावर मालाचे पैसे जमा करण्याची विनंती केली. या ई-मेलमुळे तक्रारदार कंपनीने सुमारे साडेतीन हजार अमेरिकन डॉलर (सुमारे ३२ लाख) अदा केले. पुढे हे ई-मेल बनावट असल्याचे उघडकीस आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.