माझगाव परिसरात तरुणावर गोळीबार
मुंबई, ता. १२ : माझगावच्या सायबान हॉटेलसमोर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी हल्लेखोरांनी समीर शेख या तरुणावर गोळीबार केला. या हल्ल्यात शेख जखमी झाला असून त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार समीरची तब्येत स्थिर आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर संघटित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ शेख ऊर्फ आसिफ दाढी याचा मुलगा आहे. दाऊद टोळीशी विशेषतः गँगस्टर छोटा शकीलशी सख्य असलेल्या आसिफवर गुन्हे शाखेने मोक्कानुसार कारवाई केली होती. २०१० मध्ये प्रतिस्पर्धी छोटा राजन टोळीने भेंडीबाजार परिसरात आसिफवर बेछूट गोळीबार केला होता. त्यात आसिफ बचावला; मात्र अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, समीरवर गोळीबार कोणी व का केला, याबाबत गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.