रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स
अशोक खरात प्रकरण
मुंबई, ता. १२ ः भोंदू अशोक खरात प्रकरणातील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना समन्स जारी करत १४ मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
गेल्याच आठवड्यात खरातविरोधात नोंद महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धेचा प्रसार, खंडणी आदी गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने चाकणकर यांच्याकडे सखोल चौकशी केली. चाकणकर या खरातने सुरू केलेल्या नाशिक येथील श्री शिवलिका संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. खरातने विविध व्यक्तींना नाशिक येथील दोन पतसंस्थांमध्ये खाती सुरू करण्यास भाग पाडले; मात्र ही खाती स्वतःच्या नियंत्रणात घेत त्याद्वारे सुमारे ७० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. या व्यवहारात ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून चाकणकर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा तपास ईडीकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवड्यात चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा यांच्याकडे ईडीने चौकशी केली होती. खरातने नियंत्रणात घेतलेल्या बँक खात्यांपैकी चार प्रतिभा आणि त्यांच्या मुलाच्या नावे आहेत. त्यावरून संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासादरम्यान समोर आले होते. त्याआधारे त्यांच्याकडे चौकशी केली गेली, असे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.