मराठी पाट्यांसाठी महिन्याची मुदत
पालिकेचा कठोर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ (विशेष प्रतिनिधी) ः मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीतील नामफलक लावण्याबाबत मुंबई महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या दुकानांवर अद्याप मराठी पाट्या नाहीत, त्यांना एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी बुधवारी दिला.
पालिकेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधी समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर, विविध पक्षांचे नगरसेवक आणि परवाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईत सुमारे नऊ लाख दुकाने व आस्थापना आहेत; मात्र आतापर्यंत केवळ सव्वा ते दीड लाख आस्थापनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करून १५ दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मोठ्या आस्थापनांवर प्रथम कारवाई या मोहिमेत प्रथम पंचतारांकित हॉटेल्स, मोठ्या कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आणि सेलिब्रिटींच्या मालकीच्या आस्थापनांना लक्ष्य केले जाणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केल्यास त्याचे अनुकरण सर्व स्तरावर होईल, असे मत उपमहापौरांनी व्यक्त केले. अनेक नामांकित हॉटेल्सना यापूर्वीच नोटिसा धाडण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
...
अधिकाऱ्यांवरही नजर
मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही पालिकेची नजर असणार आहे. जून महिन्यात होणाऱ्या विधी समितीच्या बैठकीत २६ प्रभागांमधील (वॉर्ड) कारवाईचा आढावा घेतला जाईल. या वेळी संबंधित विभागाच्या निरीक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून कडक सूचना दिल्या जातील, असे दीक्षा कारकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.