मुलुंडमध्ये ‘शाहीन ससाण्या’ला जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : जगातील सर्वात वेगवान पक्ष्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शाहीन ससाणा’ या दुर्मिळ पक्ष्याला मुलुंडमध्ये जीवदान देण्यात आले. शरीरातील पाणी कमी झाल्याने बेशुद्ध पडलेल्या या पक्ष्यावर तातडीने उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेला लागून असलेल्या निवासी भागात मंगळवारी हा ससाणा स्थानिकांना आढळला हाेता.
‘रेस्क्यू इंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ या संस्थेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पक्ष्याला ताब्यात घेतले. हा पक्षी ‘पेरेग्रीन फॅल्कन’ची उपप्रजाती असून तो अत्यंत दुर्मिळ मानला जातो. ‘रॉ’च्या पथकाने त्याला तातडीने प्रथमोपचार दिले. तो शुद्धीवर आल्यानंतर संस्थेच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी या शिकारी पक्ष्याची सखोल तपासणी केली. ठाणे प्रादेशिक वनविभाग (मुंबई परिक्षेत्र) आणि ‘रॉ’ यांच्या संयुक्त समन्वयाने या ससाण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा मुक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.