मुंबई

महिलांसाठी जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी ही नवीन विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी यासंदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना तज्ज्ञ उपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

पीसीओडी ही महिलांमध्ये आढळणारी हार्मोनल समस्या असून, त्याचा परिणाम मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढ, वंध्यत्व, मानसिक ताण, त्वचेच्या समस्या तसेच इतर आरोग्यविषयक गुंतागुंतांवर होत असतो. विशेषतः किशोरवयीन व प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण वाढत असल्याने राज्य शासनाने यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

शासनाच्या आदेशानुसार बुधवार (ता. ६)पासून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, १०० खाटांची उपजिल्हा रुग्णालये तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. ही क्लिनिक दर बुधवारी ‘मेनोपॉज ओपीडी’ सोबत चालविण्यात येतील.

ज्या रुग्णालयांमध्ये नियमित स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसतील, त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त स्त्रीरोगतज्ज्ञांची सेवा घेण्यात येणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी उपसंचालक, आरोग्यसेवा तसेच आयईसी विभाग यांच्यामार्फत विशेष समन्वय साधण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची माहिती, तपासणी, निदान व उपचार यांचा नियमित अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये पीसीओडी संदर्भातील जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, वेळेत निदान व उपचार मिळाल्याने भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळण्यास मोठा हातभार लागणार आहे.

क्लिनिकमध्ये उपलब्ध सेवा
- स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी
- आवश्यक वैद्यकीय तपासण्या
- एकात्मिक पद्धतीने उपचार (Integrated Approach)
- आरोग्यविषयक समुपदेशन
- आहार व जीवनशैली संदर्भातील मार्गदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT