मुंबई

थांबलेल्या तीन बसला भरधाव बेस्टची धडक

CD

थांबलेल्या तीन बसना
भरधाव बेस्टची धडक
चिरडला गेल्याने वाहकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : रस्त्यावर झाड पडल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत थांबलेल्या तीन बसना मागून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या दोन बसदरम्यान चिरडला गेल्याने एका वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १४) दुपारी अंधेरी येथील आंबोली नाका परिसरात घडली.
​अंधेरी स्थानक ते वर्सोवा या मार्गावर गुरुवारी दुपारी १.१५च्या सुमारास हा अपघात झाला. आंबोली नाका येथे रस्त्यावर एक झाड पडल्यामुळे बेस्टच्या सेवेतील मातेश्वरी एजन्सीच्या तीन बस रांगेत उभ्या होत्या. या वेळी मागून आलेल्या ओशिवरा आगाराच्या भरधाव बसने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात मातेश्वरी एजन्सीचे बसवाहक शेखर बाबूराव रावते (वय ५२) हे बसमागून जात होते. त्याच वेळी बस धडकल्याने त्यांना गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातास जबाबदार चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ताब्यात घेतलेल्या चालकाकडे अपघात कसा, कोणत्या परिस्थितीत घडला, याबाबत चौकशी सुरू आहे.
---
चौकशी समितीची स्थापना
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी बेस्टने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. मागून येणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाला होता, की चालकाचा ताबा सुटला होता, याचा शोध घेतला जात आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT