मुंबई

मुंबईत नादुरुस्त मॅनहोलचा धोका कायम

CD

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईचा धडाका लावला आहे. मात्र, या कामांदरम्यान कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे गटारांची झाकणे तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईच्या विस्तीर्ण जाळ्यात पसरलेल्या सुमारे एक लाखाहून अधिक मॅनहोल्सपैकी अनेक झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने ‘पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण’, असा संतप्त सवाल ‘मुंबई मार्च’ या सामाजिक संस्थेने उपस्थित केला आहे.

​मुंबईच्या जमिनीखाली पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांचे प्रचंड मोठे जाळे आहे. प्रशासकीय माहितीनुसार मुंबईत साधारणपणे एक लाख दोन हजार मॅनहोल्स आहेत. यामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांच्या सुमारे ७५ हजार आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या २७ हजारपेक्षा जास्त मॅनहोल्सचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या दुर्घटनांनंतर पालिकेने सखल भागातील सुमारे १० हजार ते १० हजार धोकादायक मॅनहोल्सना संरक्षक लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. मात्र, अजूनही हजारो मॅनहोल्स जाळ्यांशिवाय आहेत.

​प्रशासन नालेसफाईचा दावा करत असताना, ‘मुंबई मार्च’ संस्थेने कंत्राटदारांच्या निष्काळजीवर बोट ठेवले आहे. संस्थेचे सदस्य पंकज तिवारी यांनी बोरिवली पूर्व आणि इतर भागांतील स्थिती मांडली आहे. अनेक ठिकाणी गाळ काढताना सिमेंटची अवजड झाकणे चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे ती तुटली आहेत. हे लक्षात घेऊन ​संस्थेने काही प्रमुख मागण्या महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. मुंबईतील एक लाख मॅनहोल्सपैकी जिथे कुठे झाकणे तुटली आहेत, ती पावसाळ्यापूर्वी तातडीने बदलण्यात यावीत. २०१७ मध्ये डॉ. दीपक अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू, ही मुंबईकरांसाठी आजही एक भीतीदायक आठवण आहे. तशाच घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसवाव्यात. कंत्राटी कामगारांकडे योग्य साधने नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे, त्यावर नियंत्रण आणावे, असे त्यांनी म्हटले.

३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
​मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज (ता. १४) पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव आणि वांद्रे परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच त्यांनी प्रशासनाला बजावले की, कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेत तफावत होता कामा नये. विशेषतः सिमेंट काँक्रीटीकरण करताना पर्जन्य जलवाहिन्यांची झाकणे सुरक्षित राहतील आणि ती योग्यरीत्या बसवली जातील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

​मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात उघड्या गटारांमुळे दुर्घटना होतात. महापौरांचे कठोर निर्देश आणि सामाजिक संस्थांनी दिलेली ही आकडेवारी पाहता, प्रशासन यंदा शून्य मॅनहोल अपघाताचे लक्ष्य गाठणार का, हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT