मुंबई

अदाणी-आयएचजी करार; ‘किम्पटन’ ब्रँडचे भारतात पदार्पण

CD

अदाणी-आयएचजी करार
‘किम्पटन’ ब्रँडचे भारतात पदार्पण; नवी मुंबईसह प्रमुख शहरांत प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) आणि आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांनी भारतातील प्रमुख विमानतळ परिसर आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांत पाच हॉटेल्स उभारण्यासाठी करार केला आहे. या करारामुळे जवळपास १,५०० हून अधिक खोल्यांची भर पडणार आहे. आयएचजीचा लक्झरी लाइफस्टाइल ब्रँड ‘किम्पटन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स’ भारतात प्रथमच दाखल होणार आहे.

या करारांतर्गत जयपूर, मंगळुरू, तिरुअनंतपुरम आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी हॉटेल्स विकसित करण्यात येणार आहेत. नवी मुंबईत हॉलिडे इन, हॉलिडे इन एक्स्प्रेस तसेच जयपूरमध्ये ‘किम्पटन’ हॉटेल उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे विमानतळ-केंद्रित शहरी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अदाणी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदाणी यांनी सांगितले, की विमानतळ परिसरांना केवळ प्रवास केंद्र न ठेवता आदरातिथ्य, व्यावसायिक आणि सामाजिक सुविधा असलेल्या एकात्मिक शहरी परिसंस्थांमध्ये विकसित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आयएचजीसोबतचा हा करार त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

९८ हॉटेल्सचे नियोजन
आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे साऊथ वेस्ट आशियाचे व्यवस्थापकीय संचालक सुदीप जैन यांनी सांगितले, की भारतातील वाढते प्रवास आणि पर्यटन मागणी लक्षात घेता हा करार कंपनीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ‘किम्पटन’ ब्रँडच्या माध्यमातून भारतातील प्रीमियम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवे पर्याय उपलब्ध होतील. सध्या आयएचजी भारतात सहा ब्रँड्सअंतर्गत ५२ हॉटेल्स चालवत आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत आणखी ९८ हॉटेल्स सुरू करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT