मुंबई

मराठी पाट्यांसाठी ११३ दुकानांना दणका

CD

मराठी पाट्यांसाठी
११३ दुकानांना दणका

‘ए’ विभागात पालिकेची कारवाई

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिकेच्या ‘ए’ विभाग (फोर्ट, नरिमन पॉइंट, कुलाबा) कार्यक्षेत्रात आज राबवण्यात आलेल्या विशेष धडक मोहिमेत ११३ दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी या मोहिमेचा आढावा घेऊन प्रशासनाला नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आज केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान असे दिसून आले की, ‘ए’ विभागातील बहुतांश व्यापाऱ्यांनी मराठी पाट्यांच्या नियमाचे स्वागत केले आहे. तपासणी केलेल्या ३,४५५ आस्थापनांपैकी ३,३४२ ठिकाणी मराठी नामफलक योग्यरितीने लावलेले आढळले, तर वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ करणाऱ्या ११३ दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT