मुंबई

पालिकाकडून निषेध ( भाग्यश्री मॅडम)

CD

वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा
पालिका मार्डकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महापालिका मार्डतर्फे कुर्ला येथील के. बी. भाभा रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

याबाबत मार्डने सांगितले की, आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात गंभीर अवस्थेतील रुग्णावर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने उपचार, निरीक्षण, आपत्कालीन हस्तक्षेप, व्हेंटिलेटर सपोर्ट, सीपीआर तसेच सर्व आवश्यक पुनर्जीवन उपचार करण्यात आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही दुर्दैवाने रुग्णास वाचविणे शक्य झाले नाही. रुग्णाचा मृत्यू घोषित झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रमक व हिंसक वर्तन करत ड्युटीवरील निवासी डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेत मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, रुग्णालयातील मालमत्तेचे नुकसान, वैद्यकीय सेवेत अडथळा आणि आपत्कालीन विभागात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचेही मार्डच्या वतीने सांगण्यात आले.
या हल्ल्यानंतर मार्डने काही मागण्या केल्या आहेत. ज्यात सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासंबंधी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी, सुरक्षा व्यवस्थेला बळकटी द्यावी, आपत्कालीन विभागात कायमस्वरूपी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमावा इत्यादी मागण्यात केल्या आहेत.
याबाबत महापालिका मार्डचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर म्हणाले की, महापालिका मार्ड प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याचे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT