मुंबई

कुर्ल्यात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

CD

कुर्ल्यात प्रसूतीनंतर
महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कुर्ला पश्चिम येथील भाभा रुग्णालय येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या २८ वर्षीय महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनी हरीश यादव (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या कथित हलगर्जीमुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
कुर्ला पश्चिममधील हलाव पूल परिसरात राहणाऱ्या साेनी यांना साेमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची रात्री १० वाजता सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. त्यांनी मुलाला जन्म दिला. बुधवारी (ता. १३) दुपारी २.३०च्या सुमारास सोनी यांनी छातीत तीव्र दुखत असल्याची तक्रार रुग्णालय कर्मचाऱ्यांकडे केली हाेती. त्यानंतर प्रकृती आणखी बिघडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महिलेचा मृतदेह जे. जे. रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT