मुंबई

वांद्रे तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग; सुरक्षेची चिंता कायम

CD

वांद्रे तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग; सुरक्षेची चिंता कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वांद्रे पश्चिमेतील ऐतिहासिक वांद्रे तलावाचे मागील काही महिन्यांपासून रखडलेले पुनरुज्जीवनाचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, स्थानिकांना एक वेगळीच भीती सतावत आहे. तलावाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, परंतु तेथील सुरक्षेच्या प्रश्न सुटणार की नाही, असा प्रश्‍न रहिवासी उपस्‍थित करीत आहेत.
जवळपास २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक तलावाच्या खालावत चाललेल्या स्थितीबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती, परंतु पालिकेने तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत ३५ हजार घनमीटर पाणी काढण्याचे काम पूर्ण झाले असून, जलनिस्सारणाचे कामही पूर्ण झाले आहे. याआधीही या तलावासाठी कोटी रुपये खर्च करून लोखंडी रेलिंग, स्ट्रीट लाईट्स, जॉजिंग ट्रॅकही बसवले होते. मात्र, काही महिन्यातच त्याची तोडफोड झाली. स्ट्रीट लाईट चोरीला गेले, जॉगिंग ट्रॅक चालण्यासाठीही राहिले नाहीत. या वेळी तरी परिस्थितीत सुधारणा होईल का, अशी विचारणा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मानसिकतेचे काय
वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणानंतरही तलावात कचरा टाकणे, शिळे अन्न, मासेमारी सुरू होती. त्यामुळेही दुर्गंधी तसेच मासे मरण्यामुळे वेगळी दुर्गंधी होत असे. त्यामुळे स्थानिकांच्या मानसिकतेत सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सामाजिक भान न जपल्यास लाखो रुपये खर्च करून, सुशोभीकरण करूनही काही महिन्यांनी पुन्हा तीच समस्या निर्माण होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर
एकेकाळी हा तलाव ज्येष्ठ, महिला, लहान मुलांच्या आवडीचा होता. तलावातील कारंजे, बोटिंग लोकप्रिय होते. कालांतराने सुरक्षा रक्षकाच्या अभावी ही जागा भिकारी, गर्दुल्यांनी काबीज केली. ऐन दुपारी या ठिकाणी जुगाराचे डाव रंगायचे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला इथे येण्यास घाबरतात.

शेलार यांच्याकडून पाहणी
मुंबई उपनगरचे पालकमंत्री व स्थानिक आमदार आशीष शेलार यांनी तलावाची नुकतीच पाहणी केली. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तलावाचे पुनरुज्जीवन करताना पाणी पूर्णपणे काढून गाळही काढण्यात येणार आहे, पण भविष्यातही ते असेच स्वच्छ राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
-अनिकेत नाईक, स्थानिक रहिवासी

तलावाजवळ संध्याकाळी जाणे महिलांना भीतीदायक वाटते, तलावाच्या पुनरुज्जीवनासोबत सुरक्षेसंदर्भात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
- विशाल सुर्वे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT