मुंबई अतिक्रमणांवर
कारवाईचे निर्देश
महापौर तावडे यांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. पालिका प्रशासनाने त्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील अतिक्रमांचा शुक्रवारी (ता. १५) आढावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला महापौरांनी कारवाईचे निर्देश दिले.
मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे अनियमित कारभार आणि बेकायदा बांधकामांसंदर्भात महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आमदार मिहिर कोटेचा, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. निवडणुकीच्या काळात अतिक्रमणे झाली असून, अतिक्रमणे वाढत असल्याच्या स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आज पूर्व उपनगरात महापौर रितू तावडे यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत कारवाईचे निर्देश दिले.
पथके तैनात करणार
पूर्व उपनगरांतील अतिक्रमणांचा महापौरांनी आढावा घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई पूर्व उपनगरांतून सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. या कारवाईसाठी पालिकेची पथके तैनात करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.